चांद्रयान ३

चांद्रयान ३ : चंद्रावर आढळले सल्फर आणि ऑक्सिजन प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट

भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार रोव्हरवर लावलेल्या लेझर ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपने पहिल्यांदा दक्षिण ध्रुवाकडील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर घटक असल्याची खातरजमा केली आहे. त्यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) चे घटक असल्याचा खुलासा झाला आहे. प्रज्ञान रोव्हरमध्ये बसवण्यात आलेल्या ‘लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) यंत्राद्वारे ऑक्सिजनचा शोध लागला आहे. एलआयबीएस उपकरण हे इस्त्रोच्या बंगळुरूतील प्रयोगशाळेत बनवण्यात आले आहे. पृथ्वीवर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे. तेच आता चंद्रावर सापडल्याने भारताच्या मिशनला मोठे यश येताना दिसत आहे. दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

 

आमचे Youtube चॅनल फॉलो करा

About Marathi E Batmya

Check Also

मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, राजकारण करू नका, पण भारताचे यश वाखाणण्या जोगे आज झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) नमूद केले की, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे “आव्हानात्मक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *