Breaking News

Tag Archives: अजित पवार

अजित पवार यांचे आदेश, नांदेड जिल्ह्यातील कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, ब्रिटीशांच्या रौलेट ॲक्टच्या धर्तीवर महायुतीचा ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसतोय

राज्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर जोरदार हल्ला चढवित शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर महायुती सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला राज्यातील महायुती सरकारवर केली. या कायद्यावर बोलताना …

Read More »

आता अजित पवार ही भिजले बारामतीच्या जन सन्मान रॅलीत कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही...

विशेष म्हणजे अजित पवार हे बारामतीत सभेच्या ठिकाणी बोलण्यास उभे राहिले, अन् अजित पवार यांनी डायस पावसात राहिलं अशा स्वरुपात लावण्यास सांगण्यास सांगितले आणि पावसात भिजत सभेचे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, वरुण राजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य

रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब

महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय

काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …

Read More »

कॅगचे सरकारला खडेबोल, वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत कॅगने व्यक्त केली चिंता

नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …

Read More »

मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के जीवीत व वित्तहानी झाली नसल्याची अजित पवार यांची निवेदनाद्वारे विधानसभेत माहिती

राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी देणार

राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. दूधभेसळीसंदर्भात विधानसभा सदस्यांनी …

Read More »

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यात सर्वाधिक रक्कम माझी लाडकी बहीण योजनेला तिजोरीत पैसे नसताना पैसे असण्याचे अजित पवार यांचे स्वांग

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत १० वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहिरपणे सांगत आले आहेत. मात्र यावेळी आधीच महसूली तूटीचा अर्थसंकल्प सादर करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच आता पुन्हा नव्याने ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. या ९४ हजारच्या पुरवणी मागण्या सादर करताना …

Read More »