Breaking News

Tag Archives: शरद पवार

अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …

Read More »

शरद पवार यांचा निर्धार, लोकशाहीच्या मार्गाला, शांततेला धक्का देणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला करू जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून …

Read More »

सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द कराः सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी पक्षविरोधी कारवाया केल्याने पत्राद्वारे केली कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाळी होत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोबत गेलेले लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना पक्ष विरोधी कारवाया केल्या असल्याचा ठपका ठेवत या दोघांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि …

Read More »

अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, शपथविधीला बोलावून अजित पवारांनी कशावर सह्या घेतल्या… महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत शरद पवारसाहेब यांच्याबरोबर राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत …

Read More »

जितेंद्र आव्हाड म्हणाले, थांबा जरा, टेलिफोन ऑपरेटरने फोन लावायला सुरुवात… विरोधी पक्षनेते पद आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाल्यानंतर दिला सूचक इशारा

अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते. अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसंच, विधिमंडळाच्या …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले, जे गेले ते ईडीच्या भीतीने… अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक जण ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार असे दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार म्हणाले, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो… ज्या आरोपांचा उल्लेख केला आणि ते आरोप ज्यांच्याशी संबधित होते त्यांना सहभागी करून सुटका केली

नुकतेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेत टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवार यांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १० ते १२ आमदारांना सोबत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री …

Read More »

राज्याच्या राजकारणात भाजपाच्या चार ‘भ’ चा पुन्हा एक बळीः अजित पवारांची बंडखोरी शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांसह राष्ट्रवादीतील बडे नेतेही भाजपाच्या वळचणीला

२०१४ साली महाराष्ट्रासह देशात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच निवृत्त होणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने त्यावेळच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले होते की, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार म्हणजे भाषण, भ्रम, भ्रमंती आणि भय या चार भ च्या आधारे चालणारे सरकार असून यांच्या काळात चार भ शिवाय काहीही …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला

समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …

Read More »