पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन …
Read More »सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये
मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध महाज्योतीला १५०० कोटींचा निधी; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे
महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसीं) ६३ वसतिगृहे तयार केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच जबाबदार १० ऑक्टोबरचा मोर्चा रद्द करावा; मुख्यमंत्र्यांची ओबीसी शिष्टमंडळाला विनंती
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती …
Read More »राष्ट्रवादीच्या राज राजापूरकर यांचा आरोप, फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका ओबीसी बैठकीतून डावलल्याचा आरोप
ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार पक्ष) हेतुपुरस्सर डावलण्यात आले, असा घणाघाती आरोप पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी आज केला. एका बाजूला बैठकीचे निमंत्रण न देता चर्चेपासून दूर ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार पक्ष ओबीसींच्या प्रश्नावर …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या
हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …
Read More »आत्महत्या ग्रस्त कराड कुटुंबीयांची मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली सांत्वनपर भेट ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू - मंत्री छगन भुजबळ
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …
Read More »
Marathi e-Batmya