Tag Archives: खारघर

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “वाहे गुरु” व “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी …

Read More »

रिलसाठी तरूणीचा चालत्या कारच्या बोनेटवर डान्स, पोलिसांकडून गुन्हा दाखल घटनेच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल, म्हणे रविवारी रिल व्हायरल

नवी मुंबईतील खारघर परिसरात चालत्या मर्सिडीज-बेंझच्या बोनेटवर व्हायरल ऑरा फार्मिंग नृत्य करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑरा फार्मिंग नृत्य, ज्याला आयकॉनिक “बोट डान्स” म्हणूनही ओळखले जाते, ते ११ वर्षांच्या इंडोनेशियन मुलाने, रेयान अर्कान दिखा, लोकप्रिय केले होते, जो आता इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. क्लिपमध्ये, ती महिला …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, दारूबंदीचे निवेदन मिळाल्यास योग्य ती कार्यवाही करणार भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन

खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलत होते. अजित …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »