Tag Archives: डॉ मनमोहन सिंग

आता राजघाटावर डॉ मनमोहन सिंग याचे नव्हे तर प्रणव मुखर्जी यांचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तसे पत्र शर्मिष्ठा मुखर्जी यांना दिले

केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची समाधी उभारण्यासाठी “राष्ट्रीय स्मृती” संकुलात (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने आज त्यांना शहरी व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि या …

Read More »

प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …

Read More »

डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले

“पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. आज डॉ मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ मनमोहन सिंग यांनी केले …

Read More »

राष्ट्राध्यक्ष जो बिडेन डॉ मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, खरा राजकारणी युएस-भारत संबध मजबूत करण्यात डॉ मनमोहन सिंह यांची भूमिका महत्वपूर्व

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांना “खरा राजकारणी” म्हटले आहे आणि द्विपक्षीय सहकार्याच्या अभूतपूर्व पातळीसाठी त्यांची धोरणात्मक दृष्टी आणि राजकीय धैर्य यांस श्रेय दिले आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाबाबत एक निवेदन जारी केले. त्या निवेदनात डॉ मनमोहन सिंग यांच्या बद्दलचे …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये अॅडमिट केले

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी दिल्लीतील एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉ मनमोहन सिंग हे ९२ वर्षाचे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. तथापि, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप कळलेले नाही. …

Read More »