राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या …
Read More »-मुख्यमंत्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी …
Read More »दादाजी भुसे यांची स्पष्टोक्ती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या घसरलेली
शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री भुसे बोलत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्रिभाषा असताना द्विभाषा सुत्र स्विकारू शकत नाही आता पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही पण अन्य भाषेचा पर्याय
राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिली ते पाचवीपर्यंत मराठी-इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थी आता तिसरी भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा निवडू शकतात. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल. विभागाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक, कुंभमेळ्याचे मुहुर्त
कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य …
Read More »आता शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीस मान्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालिन निदेशकांची नियुक्ती, मानधन, शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली …
Read More »हिंदी भाषेवरून राज्य सरकारची माघारः आता अनिवार्य नाही तर ऐच्छिक राहणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हिंदी भाषेवरून शालेय शिक्षण मंत्र्याला इशारा मराठी शाळांमध्ये हिंदी अनिवार्य? – मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला
राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक व शैक्षणिक स्वायत्ततेवर सरळसरळ आक्रमण आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने ‘अभिजात भाषा’ म्हणून सन्मान दिला. अशा काळात मराठीच्या प्रचारासाठी धोरण आखण्याऐवजी राज्य सरकार दुसऱ्याच भाषेचा अनावश्यक प्रचार करत आहे, हे …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा सीबीएसई पॅटर्न मराठी शाळांसाठी घातक, मराठी शाळा संपवण्याचा नियोजित डाव
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई CBSE पॅटर्नवर पुढील शैक्षणिक वर्षापासून आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा युती सरकारचा हा निर्णय राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बालभारतीच्या अस्तित्वावर गदा आणणारा आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. …
Read More »दादाजी भुसे यांचे आदेश, आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप करा शाळांना पूर्वकल्पना देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. …
Read More »
Marathi e-Batmya