Tag Archives: दुष्काळी परिस्थिती

मकरंद जाधव पाटील यांची माहिती, ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ३१०, नव्याने समाविष्ट तालुक्यांत विविध उपाययोजना व सवलती लागू

राज्य शासनाने यापूर्वी दुष्काळ घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. त्यामुळे राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या आता ३१० झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालाच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत जलयुक्त शिवार ३.० ची १८ हजार गावांत अंमलबजावणी

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य शासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाच्या जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना, शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदारांसोबत बैठकीनंतर केली सूचना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा लागवड, गोवंश जिवंत ठेवण्यासह जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वापरावा अशी सूचना महसूलमंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली . राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन संवाद साधत दुष्काळाशी सामना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत नेटवर्क नसलेल्या भागांत ऑफलाइन नोंदणीची सुविधा

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता येणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, राज्यातील ३ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३ कोटी २० लाख शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी …

Read More »

आदिती तटकरे यांचे आवाहन, गावागावांत वनराई बंधारे बांधून जलसाठ्याचे संवर्धन करा दुष्काळ निवारणासाठी वर्षभर नियोजन करण्याचे निर्देश

हवामान बदलामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढून उपलब्ध जलसाठा लवकर कमी होत आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी व वन विभागाच्या समन्वयातून गावागावांत वनराई बंधारे बांधावेत. रोजगार हमी योजना, ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे वर्षभर राबवावीत. तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित सहकारी संस्थांवरील प्रशासक नियुक्ती नियमात सुधारणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियमात सुधारणा करण्याचा निर्णय

दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्हयातील सहकारी संस्थांची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ …

Read More »

दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून सविस्तर सादरीकरण ११ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा

खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. ११ ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील दुष्काळी उपाययोजनांमध्ये शेतकरी व शेतमजुरांना सर्वोच्च प्राधान्य • मंत्रिमंडळ उपसमितीकडून पीक कर्ज, पाणी, चारा नियोजनाचा आढावा

दुष्काळग्रस्त भागांतील पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसेच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची …

Read More »

शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य …

Read More »