शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या १०० टक्के कर्जमाफीसह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्या पाऊस पडला नसल्याने माणसं आणि गुरं-ढोरं कशी जगवायची, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी २७ तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुरंदरसह अन्य वंचित तालुक्यांत पूर्णपणे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.आता शेतात जी पिकं आहेत, ती कशी वाचवता येतील याचा विचार करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार आहे, मुख्यमंत्र्यांनी काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. पण काही तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नाही. तिथे दुष्काळ जाहीर करण्यात आला पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्टातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. हे संकट खूप मोठं आहे. त्यामुळे मी राज्य सरकारशी बोलत आहे. काही तालुक्यांमध्ये अद्यापही दुष्काळ जाहीर झालेला नाही. पुरंदर सारखा तालुका दुष्काळाच्या यादीतून वंचित आहे. या तालुक्यांना दुष्काळाच्या यादीत समाविष्ट केलं पाहिजे, मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तुमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करणार आहे,असे आश्वासन दिले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, दुष्काळाबाबतच्या काही मागण्या फडणवीस यांच्या कानावर टाकल्या होत्या. त्यावर लोकांच्या भावना समजून घेऊन निर्णय घेतो, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावर, तुम्हीही माहिती घ्या. मी ही गावागावत जाऊन माहिती घेतो, असं मी फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही दुष्काळी परिस्थिती संदर्भात अनेक मुद्दे मांडले आहेत. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन तुमचे हे मुद्दे त्यांच्यासमोर मांडून त्यावर मार्ग काढला जाईल, याची खात्री देतो, असेही स्पष्टपणे सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत पीएमओची दखल

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती मागवल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *