पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे तसेच सोलापूर विमानतळाचे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, आता गौतम अदानीचा फोटोही महापुरुंषासोबत…. चंद्रपूरातील शाळा अदानी फाऊंडेशनला चालवायला देण्याचा सरकारचा निर्णय
राज्यातील जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या शाळा आता खाजगी कंपन्यांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला. आधीच राज्यातील अनेक ठिकाणचे भूखंड आणि संपूर्ण मुंबई शहरातील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड आधीच अदानीच्या घशात राज्यातील सरकारने धारावी पुर्नवसनच्या नावाखाली घातले असताना आता शाळाही अदानीच्या घराशात घालण्याची तयारी सुरु केली …
Read More »‘सारथी’ च्या कार्यालयासह २२५ कोटींच्या विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ५०० मुले ५०० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह
नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी च्या १५६ कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, ५०० मुलांची व ५०० मुलींची वसतिगृह इमारत तसेच ४३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ फडणवीसांची चिंता करू नये दरेकरांची संजय राऊतांवर टीका
सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी ट्विट करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली असल्याचा पलटवारही …
Read More »सागर बंगल्याचा आशीर्वादाने नेते दहशत… रोहित पवार यांचा आरोप रोहित आर.आर.पाटील यांचे आंदोलन, तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर अयाज मुल्ला यांच्यावर भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी अयाज मुल्ला यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेत मुल्ला यांची ७६ वर्षीय आईने आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न …
Read More »बिच्चारे अजित पवार, “इकडून धक्का, तिकडून धक्का देतोस का रे” म्हणण्याची पाळी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अजित पवार यांना बाहेर पडण्यासाठी आणखी एक निमित्त
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मध्य प्रदेशातील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांना मत देणे म्हणजे शरद पवार यांच्या घराणेशाहीला मत अशी टीका केली. त्यानंतर पुढील काही दिवसातच राष्ट्रवादीत नाराजी नामा घडत अजित पवार …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आदेश,… सिंचन क्षमता वाढवा राज्यातील २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …
Read More »बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एनकांऊटरची सीआयडी चौकशी ठाणे पोलिसांनी यासंदर्भात सीआयडी आणि ह्युमन राईटला पाठवले पत्र
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरमध्ये मृत्यू झाला. या एनकांऊटरनंतर राज्यातील सर्वच स्तरातून पोलिसांच्या या एनकांऊटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून विरोधकांनी तर राज्य सरकारलाच धारेवर धरले. दरम्यान अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येणार असल्याची पुढे येत आहे. ठाणे पोलिसांनी शिष्टानुसार यापूर्वीच …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, कर्जत जामखेडमध्ये भाजपा परिवर्तन घडविणार शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी …
Read More »
Marathi e-Batmya