पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …
Read More »१३ लाख शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, धारावीच्या आडूण मुंबई गिळू देणार नाही कोरोना काळात सेंटर्सची जमिन बुलेट ट्रेनला दिली
देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपडपट्टी आता एका उद्योपतीच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. तुम्ही पाह्यलं असेल तो कोण आहे आणि कोणाचा मित्र आहे ते असा उपरोधिक सवाल करत मी तर त्याला पाहिला नाही. पण तुम्ही त्याला पाह्यला असेल तो कोणाचा मित्र आहे. जे काही असेल ते घाल …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी राज्यात बंदरे क्षेत्रात झपाट्याने विकास, गुंतवणूकदारांचे स्वागत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते विविध उपक्रमांचे …
Read More »जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?
साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ …
Read More »पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फडणवीसांना समजून सांगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा १०० एकरच वावर विकत घेतलं नाही तर भाड्याने घेतलंय, सदावर्ते तुमचाच कार्यकर्ता
आंतरावली सराटे येथील जाहिर सभेसाठी आम्ही १०० एकराचं वावर घेतल्याचं समजताच काही जण आमच्यावर मराठा समाजानेच निवडूण दिलेल्यांकडून आमच्यावर आरोप करायला लागले की, इतका पैसा आला कोठून यांना १० कोटी मिळाले. निवडून दिलेल्या आमदाराने मराठा समाजाचा पैसा खाल्यानेच त्यांना तिकडचं बेसण खाऊन यावं लागलं असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील …
Read More »केवळ या महिलांनाच मिळणार मातृ वंदना योजनेचा लाभ, जाणून घ्या अटी सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’
दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची …
Read More »नव्याने लागू झालेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नेमकी काय आहे? राज्यात लागू-मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची माहिती
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच उदिष्ट तरुणांच्या जीवनाशी खेळणाऱ्या ड्रग माफियांविरोधात ‘नाशिक बचाव’ आंदोलन करणार
इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान व न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य इंग्रज सत्तेला …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,… पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का? मोदी सरकारची धोरणे, योजना ह्या मित्रों व अदानीच ठरवतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya