काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …
Read More »नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत
२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… दडपशाही धोरणामुळे लोकशाही धोक्यात
देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही …
Read More »केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ट्विटरवरून मुस्लिम लीगवर बंदी नव्या कायद्यातंर्गत युएपीए कायद्याखाली केली कारवाई
देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी असलेल्या ३७० कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा देण्यात आला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या अजेंढ्यावरील विषयाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० च रद्द केले. त्याचबरोबर या राज्याचा दर्जाही काढून घेतला. संसदेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसे भाजपाच्या हुकूशाहीलाही पाठवू…
देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी …
Read More »संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…
तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …
Read More »रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपाने सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी वापरण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी …
Read More »वांद्र्यांत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या
गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल,… खरंच गुड गव्हर्नन्स तरी आहे का?
देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. परंतु या दिवसाचे औचित्य साधत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा गुड गव्हर्नन्स दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र याच दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya