Tag Archives: भाजपा

हसन मुश्रीफ महायुतीत; कोल्हापूरात सतेज बंटी पाटील यांची स्पष्टोक्ती, हे शक्य नाही मुश्रीफ-पाटील यांच्या दोस्तीला ब्रेक

कोल्हापूरच्या राजकारणात भाजपाला काही केल्या टिकू द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. यापूर्वी भाजपाच्या महादेव महाडीक यांच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचे कामही या जोडगोळीने केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन …

Read More »

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, …

Read More »

अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटले, “पण आज आई असायला हवी होती…” इर्शाळगड ते धारावी सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा पाठवित सात दिवसात लेखी म्हणणे मांडण्याची मुदत दिली. त्याचबरोबर राज्यातील भाजपाप्रणित सरकार कायम टीकविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट फोडत सरकारमध्ये सहभागी करून घेतला. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल लवकरच होणार अशी चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आदिवासी, आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी कृती आराखडा वनविभागाची जमिन किंवा प्रसंगी राज्य सरकार जमिन खरेदी करणार

आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार …

Read More »

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या त्या मागणीवर पंतप्रधान मोदी काहीसे गोंधळले लोकसभेतील गटनेते अधिरंजन चौधरी यांनी दिली माहिती

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. या सगळ्या घडामोडीत नुकताच दोन मुलींची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. तसेच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच मागणी केली. …

Read More »

भास्कर जाधव यांनी निषेध करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोड केक खाऊ घाला प्रश्न आणि लक्षवेधीवर बोलण्यास वेळ न दिल्याने भास्कर जाधव यांनी केला अध्यक्षांचा निषेध

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये किरीट सोमय्या प्रकरण व नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेचा मुद्दा गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात …

Read More »

अबू आझमी यांची घोषणा, मी वंदे मातरम् म्हणणार नाही; विधानसभेत गदारोळ १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब

विधिमंडळात मागील दोन दिवसात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणलेला अपात्रतेचा मुद्दा आणि किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्यावरून सभागृहात राजकिय खडाजंगी रंगली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मी वंदे मातरम् म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने सत्ताधारी बाकावरील भाजपा शिंदे गटाच्या …

Read More »