मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ? जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, विरोधी पक्ष सरकारला जागे करेल
सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत …
Read More »बाळासाहेब थोरात यांची मागणी, गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न …
Read More »अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, त्यांना कायदेविषयक अंमलबजावणीचे काम नाही… उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यानी निवेदन करण्याचे दिले होते आदेश
मुंबईसह राज्यात कंत्राटी पध्दतीने पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि भाजपाचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. या निर्णयाचे पडसाद सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान …
Read More »मंत्री अनिल पाटील, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करा अधिकाऱ्यांच्या बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांचे आदेश
दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव १० दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे …
Read More »एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न
अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ …
Read More »मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलांवामध्ये किती आहे पाणी साठा पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार की तसाच पुढे सुरु राहणार
मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वापरा योग्य कमी पाण्याचा साठा राहिला. यापार्श्वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरापालिकेने घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आणि धरणक्षेत्रात थोडा थोडा करीत आता ५०.१८ टक्के पाणी …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश
मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील ( स्वायत्त महाविद्यालये वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने एकेडॅमिक बँक ऑफ …
Read More »मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार
झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …
Read More »
Marathi e-Batmya