राज्यातील जनतेचा राजकीय मतभेद बाजूला सारून आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचा इतिहास असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत सांगितले. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर, तामिळनाडूसोबतच्या कावेरी पाणीवाटप वादावर राज्याची कायदेशीर आणि राजकीय रणनीती आखण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय …
Read More »भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत
भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. …
Read More »शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात चिकन बिर्याणी देण्याचा मुख्यमंत्री विजय यांचा विचार मध्यान भोजनात अंडी देण्याच्या निर्णयानंतर आता चिकन बिर्याणी देण्याचा विचार
तामिळनाडू सरकार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावर विचार करत आहे. शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी ही कल्पना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर मांडली. या प्रस्तावावर बोलताना राजमोहन म्हणाले की, राज्यातील प्रत्येक प्रमुख राजकीय काळात शालेय पोषण कार्यक्रम आपापल्या परीने अधिक मजबूत करण्यात आला …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार, एनडीपीएस खालील प्रकरणासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन, कुर्डूवाडी येथे दिवाणी न्यायालयास मान्यता, कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयास मान्यता, अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेडसह यवतमाळला अनन्य विशेष न्यायालये, गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर अधिक कठोर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन प्रकल्प महत्त्वपूर्ण उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे प्रकल्पांचे सादरीकरण
पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामुहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार
पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीसाठी संबंधित कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गारगाई जलसिंचन प्रकल्प आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी, हजारो रुग्णांनी घेतला 'महाआरोग्य शिबिरा'चा लाभ
आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन
जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या …
Read More »
Marathi e-Batmya