Tag Archives: रविंद्र चव्हाण

रविंद्र चव्हाण म्हणाले, विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. १२५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि ११०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले. भाजपा …

Read More »

काँग्रेस नेते स्व.राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव, दिलीप माने यांचा भाजपा मध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर …

Read More »

वंदे मातरम प्रश्नी आ. रईस शेख यांची संकल्पना भाजपाने उचलली, जाहिर केला स्वतःचा कार्यक्रम सर्वात आधी आमदार रईस शेख यांनी जाहिरपणे सर्व शाळांमध्ये कार्यक्रम घेण्याची केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्याबाबतची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिले होते. तसेच याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी केली होती. मात्र यावर राज्य …

Read More »

रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …

Read More »

रविंद्र चव्हाण यांची माहिती, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र …

Read More »

शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली ‘उबाठा’ च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री …

Read More »

कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …

Read More »

मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या …

Read More »

भोर, मुळशी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

पुणे जिल्ह्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी  बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. …

Read More »

वसई-विरारच्या ‘बविआ’ च्या माजी नगसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत

वसई- विरार मधील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील,  प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी …

Read More »