Tag Archives: राज्य निवडणूक आयोग

या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुट्टी ७ फेब्रुवारीस मतदान, उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. या निवडणुकीमध्ये  राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. यानुसार, निवडणूक  होणाऱ्या …

Read More »

जि.प आणि पंचायत समित्यांच्या मतदान आणि मतमोजणीच्या तारखा बदलल्या ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५  पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७  फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे. नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या राज्य निवडणूक आयोगाने जारी केली माहिती

मागील ७ ते नऊ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. तर आज या महानगरपालिकांचे निकाल मतमोजणीनंतर जाहिर करण्यात आले. मात्र आज झालेल्या मतमोजणीत चंद्रपूर, कोल्हापूर वगळता जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी महापालिकांच्या …

Read More »

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी – २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तात्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी …

Read More »

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्टोक्ती

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी …

Read More »

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदारांकरिता ३९ हजार ९२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात १५ हजार ९०८ उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आदेश जुनाच

महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे. जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह …

Read More »

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा जाहिर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहिर केला निवडणूक कार्यक्रम

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु असून आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांकडून महापालिका निवडणूका जिंकण्याची तयारीत आहे. महापालिका निवडणूकीसाठीचा प्रचार आज संपत असून मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी …

Read More »

लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव मात्र आयोगाची फक्त जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास परवानगी

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. “लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” …

Read More »