Tag Archives: शालेय शिक्षण मंत्री

दादाजी भुसे यांची माहिती, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत ४०५ शाळा विकसित करणार विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार

राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळांचे ऑडिट करणार अधिक निधीसाठी शासन प्रयत्नशील

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची  अवस्था लक्षात घेऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळांचे ऑडिट करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. सदस्य रईस शेख यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. शालेय शिक्षण मंत्री …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, मुलींच्या शिक्षणासाठी शासनाचा सर्वांगीण प्रयत्न विधान परिषदेत दिली माहिती

राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वांगीण उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे, अभिजीत …

Read More »

खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणी, नियमन, व गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिनियम आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. राज्यातील खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी पोर्टलवर अनिवार्य करण्याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, शाळांच्या सुविधा उभारणीसाठी विविध स्रोतांतून निधीचा प्रभावी उपयोग सीएसआर फंड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी निधी वापरणार

राज्यातील शाळांची भौतिक सुविधा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच मनरेगा अंतर्गत कंपाऊंड वॉलसारखी कामे करता येतात. जिल्हा परिषदेचा सेस निधी, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, गौण खनिज निधी, सीएसआर आणि लोकसभा निधी या माध्यमांतूनही शाळांमधील सुविधा उभारल्या जात आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत उपस्थित लक्षवेधीचे उत्तर …

Read More »

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद पडण्याच्या स्थितीवर विधानसभेत चर्चा ७२,००० शिक्षक पदे केली कमी

राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी, मराठी भाषा दिनी विधानसभेत सदस्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि सरकारकडून उत्तरे मागितली. शहरीकरणाचा परिणाम राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक शालेय पोषण कामगारांच्या मानधनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन,शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग करा शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार निधी वापरा

राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य यांची सहविचार बैठक

राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत …

Read More »

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय …

Read More »