‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पुनर्विकासातील अडथळे दूर करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २३ जानेवारी पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी या योजना आणून बाळासाहेबांच्या चरणी …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबई पागडीमुक्त सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली
मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून …
Read More »जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित करताच तटकरेंच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची योजना कधीच बंद होणार नसल्याची सारवासारव
नागपूरातील हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, लाडकी बहिण योजना आता सरकारला झेपत नसल्यानेच आता लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. तसेच केवायसी करणे आदी नियमांची शोधाशोध तुम्ही सरकारने सुरु केली आहे. आता आऊट ऑफ कंट्रोल होत असल्यानेच सरकारने या गोष्टी …
Read More »भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
कामाला महत्त्व देणारी, संकटात साथ देणारी आणि आपत्तीत मदत करणारी ही खरी शिवसेना आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता या निवडणुकीत नक्की देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात कल्याण डोंबिवलीमधील भाजपाचे तीन नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकणार
नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा”, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणशिंगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून फुंकले. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, दरवर्षी सुमारे ३०० मेगॅवॅट वीजनिर्मितीचे लक्ष एसटीच्या मोकळ्या जागेवर ' सौर ऊर्जा प्रकल्पा ' उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन …
Read More »एकनाथ शिंदे यांचे निर्देश अधिछात्रवृत्ती आणि शिष्यवृतीची दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करा उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत नियुक्त समितीने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या स्वायस्त संस्थांमध्ये …
Read More »एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट
एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी
भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …
Read More »प्रताप सरनाईक यांचा स्लीपर(शयनयान ) बस प्रवाशांसाठी सुरक्षा इशारा “सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास” कुर्नूल दुर्घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाची जनजागृती मोहीम सुरू
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे नुकतेच स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले …
Read More »
Marathi e-Batmya