Tag Archives: शिवाजी महाराज

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री योगींनी माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट …

Read More »

भैय्याजी जोशी म्हणाले, औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार शिवाजी महाराजांनी तर किल्ल्यावर अफझलखानाची कबर बांधली

मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उपस्थितीत करत कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यावरून नागपूरात हिंसाचारही झाला. तर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सुनिल आंबेकर यांनी हे प्रकरण अनावश्यक असल्याचे सांगत या प्रकऱणावर पडदा …

Read More »

राज ठाकरे यांची स्षष्टोक्ती, चित्रपटाने जागा होणारा हिंदू काही कामाचा नाही मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठीच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा

तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजं दैदिप्यमान कामगिरी समजली होय. त्याआधी तुम्हाला ती माहित नव्हती का? चित्रपटात विकी कौशल मेल्यानंतर तुम्हाला कसे हाल हाल करून मारले हे कळले. तर अक्षय खन्ना तुमच्यासमोर औरंगजेब बनून आला त्यावेळी तुम्हाला कळले का, तो काय माणू होता म्हणून. पण इतिहासाच्या पानावर काही …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महायुती सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ …’ सारखे टोळ्यांचे सरकार औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव

राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन हर्देषऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा

महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक …

Read More »

अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर …

Read More »

विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अवमान करा आणि पुरस्कार व संरक्षण घ्या! राज्य सरकारचे धोरण महिलांवरील बलात्कार सरकारचे अपयश, गृह विभागाचा कारभार घाशीराम कोतवालाच्या हातात असल्याचे द्योतक

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान  करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार

मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली. पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन …

Read More »

अमित शाह यांची निवडणूकीला नवी उपमा, शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातील लढाई जाहिरसभेत बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील निवडणूकीच्या सामन्याला दिली उपमा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना …

Read More »