अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अपवाद वगळता भारतीय निर्यातीवर एकूण ५०% कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) संभाव्य नुकसान रोखण्यासाठी कृतीत उतरले आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकींच्या मालिकेनंतर, पीएमओने अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाला (डीईए) उत्पादन क्षेत्रासाठी कर आणि निर्यात मंजुरी प्रक्रियांमध्ये सुधारणा …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य सचिव आणि मराठी निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स मालकांचा समावेश
मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. समितीने दीड महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, मराठी सिनेमा जगला पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या …
Read More »मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार
विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. …
Read More »भिवंडीला आशिया खंडातील लॉजिस्टिक हब साठी समिती गठीत करणार त्यात भिवंडी पूर्व चे आमदार रईस शेख यांचा समावेश
भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने भाजपा मंत्री विजय शाह यांना सुनावत चौकशीसाठी समितीची स्थापना पोलिस महासंचालकांनी थेट भरती झालेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश
ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी १९ मे २०२५ मध्य प्रदेश पोलिस महासंचालकांना …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत शासन निर्णयही जारी
राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, तसेच तमाशा तक्रार …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणी स्थापन केली समिती दोन निवृत्त महिला न्यायाधीशांसह माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती
बदलापूर येथील शाळेच्या दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वत:च्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना ‘बेटा पढाओ और बेटी बचाओ’ असे म्हणत महाराष्ट्र सरकारने मुलांना योग्य आणि अयोग्य शिकवलेच पाहिजे, असा पुनरुच्चार करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने लहान वयातच मुलांना महिला आणि मुलींचा आदर …
Read More »आयकर कायद्यातील तरतूदींचे पुनरावलोकनासाठी सीबीडीटीची समिती मसुद्यावर सूचना व हरकती मागवणार
१९६१ च्या आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) अंतर्गत अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त व्ही के गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि …
Read More »वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रूग्णालयातही होमिओपॅथिक विभाग सुरु
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंत्रालयात होमिओपॅथिक महाविद्यालयांच्या विविध समस्या आणि राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते …
Read More »नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार
नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य …
Read More »
Marathi e-Batmya