राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे सांस्कृतिक विभागानंतर मंत्री शेलार यांची माहिती
लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावे, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. …
Read More »आशिष शेलार यांचे आवाहन,“राज्य महोत्सवा” करिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी गणेशोत्सव सण पहिल्यांदाच सरकारकडून साजरा केला जातोय
गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक …
Read More »गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा
वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा …
Read More »आशिष शेलार यांची केंद्राला विनंती, ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करा इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही
“इतिहासाचे विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने या चित्रपटाचे तातडीने पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष …
Read More »सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्त्यांसंदर्भात राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मोठ्या मुर्तींचे विसर्जन समुद्रात करणार
पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मुर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील व पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र आज शासने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे. पीओपीवरील बंदीमुळे …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, पारंपारिक गोंदण कलेचा समावेश कला अभ्यासक्रमात करा अभ्यास गटाची स्थापना करण्यासाठी पावले उचला
पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे दिले. आज मंत्रालयात महाराष्ट्रातील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी हे निर्देश दिले. यावेळी सांस्कृतिक कार्य …
Read More »आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक
महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून पाचवी ते आठवी पर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली व अन्य पर्याय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा या अवाजवी, अतार्किक …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी कलाकारांचा ‘योगा’ चा उत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत योगदिनानिमित्त विशेष उपक्रम
योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत शासन निर्णयही जारी
राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, तसेच तमाशा तक्रार …
Read More »
Marathi e-Batmya