Tag Archives: after 22 days petrol price hike

सलग तिसऱ्या दिवशी डिझेल तर पेट्रोलच्या दरात २२ दिवसांनी वाढ पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग

मुंबई: प्रतिनिधी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल महागले आहे. तसंच २२ दिवसांनी पेट्रोलचे दर बदलले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी आणि पेट्रोलचे दर २० पैशांनी वाढवले आहेत. आता दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये आणि डिझेल ८९.५७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून, ब्रेंट क्रूडचा दर शनिवारी ७८ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडून ७९.३६ डॉलरवर पोहोचला. कच्चे तेल ३ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये ते ८० डॉलरपर्यंत पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. या वर्षी आतापर्यंत पेट्रोल १७.४२ रुपयांनी आणि डिझेल १५.४५ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ …

Read More »