Breaking News

Tag Archives: agriculture minister

सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

सोयाबीनची ९० दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टर …

Read More »

धनंजय मुंडे यांची माहिती, राज्यात ३१ जुलै १ कोटी ६३ लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा, आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीकविमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, खरीप २०२४ हंगामात ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत १ कोटी ६३ लाख ६० हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले असून, लाखो शेतकऱ्यांनी एक रुपया विमा सहभाग भरून पिकविमा योजनेत याही वर्षी सहभाग …

Read More »

पुरस्कार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली …

Read More »

१० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी; १५ दिवसात पीक विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान माहिती

राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती, अंदाज घेण्यात येतो. महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत. १० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय …

Read More »

धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती… ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध …

Read More »

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन, खरीप पिकांचा पीकविमा १५ जुलै पूर्वी भरून घ्या खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी …

Read More »

धनंजय मुंडे यांचे आदेश, जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटप करा खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्जाचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री …

Read More »

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …

Read More »

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केले असून …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर विजय वडेट्टीवार केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका

राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. असे असताना राज्यातील शेतकरी संकटात मरतोय तर राज्याचे कृषी मंत्री परदेशात फिरतायत अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली …

Read More »