राजकीय मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी असे मोर्चे येतात परवानगी दिलेली नाही हे माझ्या ऐकीवात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. परवानगी मागण्याचा अधिकार आहे परवानगी नाकारण्याचा अधिकार त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही मोर्चा काढणारच आहे. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा, आमच्या दैवतावर बेताल वक्तव्य …
Read More »दिपक केसरकर म्हणाले, नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला पुरस्कार नाहीच कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड् फ्रिडम पुस्तकाला दिलेल्या पुरस्कार रद्द
राज्य सरकारच्या राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड फ्रिडम या मराठी अनुदावित पुस्तकाला पुरस्कार जाहीर केला. मात्र हे पुस्तक एका नक्षलवादी चळवळीत कोबाद गांधी यांनी काम केलेले असून १० वर्षे झाले तुरुंगात आहेत. देशात नक्षलवादावर बंदी आहे. त्यामुळे या नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पाठिंबा असणे शक्य …
Read More »अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...
अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या …
Read More »विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून २९ डिसेंबरला ठरणार पुढील कामकाजाचे दिवस
विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होत आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज …
Read More »अजित पवार म्हणाले, मी आज बिन पाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं शरद पवार यांच्या वाढदिनी कार्यकर्त्ये नेत्यांना अजित पवारांकडून कान पिचक्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी भाषण केले. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना टोला लगावल्याचे …
Read More »अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत साधला चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा निधी काय कुणाच्या बापाचा आहे का? तो निधी सरकारचा आहे
मुंबईतील विकास कामांच्या शुमारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेल्याची टीका केली. तसेच आम्हाला दोनच वर्षे मिळाल्याने आम्हाला टेन्विटी टेन्विटी खेळावी लागत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत उच्च तंत्रशिक्षण …
Read More »अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल …
Read More »आंबेडकरांसोबतच्या बैठकीवर उध्दव ठाकरे म्हणाले, होय त्यांचे काही प्रश्न आहेत.. डिसेंबर अखेर वाटाघाटी पूर्ण करून महाआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
आगामी पालिका आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेले नसले. तरी यासंदर्भात उध्दव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी आंबेडकर-ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीला दुजोरा दिला. तसेच आघाडीबाबतची …
Read More »अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …
Read More »मंगलप्रभात लोढांचा खुलासा, मी तर तुलना केली…
शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya