राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …मी अॅसेसमेंट करण्यात कमी पडलो ती चूक माझी गेलेल्या वेगळा मार्ग चोखाळला तरी तो त्यांचा अधिकार
दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकीत निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बेकायदेशीर असून आरोप करत शरद पवार हे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे …
Read More »प्रफुल पटेल यांचा दावा; आमच्यात फूट नाही मात्र, शरद पवारांची ती बैठक…. जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह शपथ घेतलेल्या ९ आमदारांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्यात अजित पवार गटाकडूनही आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार …
Read More »“जरा जाऊन बघुन येतो” सांगणाऱ्या नेत्याच्या मतदारसंघातून शरद पवार यांच्या दौऱ्याचा झंझावात येवला (नाशिक) येथे राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार ;महेश तपासे यांची माहिती...
५ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या फुटीरांवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्याचा नावासह उल्लेख करत म्हणाले, छगन भुजबळ यांचा मला सकाळी फोन आला होता. ते म्हणाले, मी जरा तिकडे (अजित पवारांकडे) जाऊन बघुन येतो, काय नेमकं काय चाललयं ते. पण ते तिकडेच गेले असे …
Read More »शरद पवार म्हणाले, …पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत या नेत्यांवर निलंबनाची कारवाईः या आठ ठरावांना मंजुरी
मागील काही महिन्यांपासून सातत्याने अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अजित पवार हे भाजपाच्या सत्तेतही सहभागी झाले. मात्र अजित पवार यांनी जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा दाखल केला. तसेच आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचे सांगत शरद पवार यांच्याविरोधातील खदखदीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर आज दिल्ली दौऱ्यावर …
Read More »अजित पवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम फक्त ‘त्या’ तिघांना माहित ? ‘या’ प्रमुखांनाही नव्हता छगन भुजबळांसह शिंदे गटाच्या आमदारांनाही नव्हती कल्पना
नुकतेच राज्यात राजकिय उलथापालथ होत महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर इतक्या मोठ्या शपथविधीची माहिती कोणालाच कशी नव्हती अशी चर्चा अनेक प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी आणि राजकिय वर्तुळातील बड्या नेत्यांमध्ये सुरु झाली आहे. परंतु या …
Read More »जयंत पाटील यांचा भुजबळ यांना टोला,…तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? जे गेलेत त्यांच्यावर मी भाष्य करत नाही काही प्रश्न, विवंचना असतील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या काळात हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना कधीच कुणी दाद दिली नाही, अशी स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले, कधीही कुणीही शरद पवार साहेबांपासून दूर गेले नाही. पण आज काही लोक दुर्दैवाने दूर गेले …
Read More »सुप्रिया सुळे यांचा अजित पवार गटाला इशारा, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय
दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून संघर्ष शिगेला पोहोचत चालला आहे. त्यातच आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या गटाच्यावतीने समर्थक आमदार-कर्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि …
Read More »अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचे प्रत्युत्तर, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली नवीन कर्तृत्वान पिढी घडवू
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल करत वाढत्या वयानुसार कुठंतरी थांबायचं असतं असे सांगत निवृत्ती घेण्याचा सल्ला शरद पवार यांना दिला. तसेच शरद पवाराचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार …
Read More »अजित पवार यांची शरद पवारांना म्हणाले; घरी आराम करायला हवं, हट्टीपणा सोडा मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हा, माझा दोष आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोविड काळातही आताही सातत्याने महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागात जात सातत्याने दौरे करत असतात. मात्र काही जणांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केल्यास स्वतः शरद पवार हे मला म्हातारा म्हणू नका, किंवा वय झालंय असे म्हणून मला निवृत्त व्हा असे सांगू नका असा प्रेमळ सूचना करायचे. परंतु …
Read More »
Marathi e-Batmya