मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक उलाढाल मंदावली आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने घर खरेदी, जमिन खरेदी-विक्री व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यानुसार आज त्यासंदर्भातील गॅजेट सरकारकडून प्रसिध्द करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२० पासून घर खरेदी-जमिन …
Read More »‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ म्हणत भाजपाचा घंटानाद परवानगी न दिल्यास मंदिरे उघडू - भाजपाचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी राज्यभरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांबाहेर करण्यात आलेल्या दार उघड उद्धवा या घंटानाद आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणाऱ्या आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास प्रार्थनास्थळे नाईलाजाने उघडू , असा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विधान …
Read More »खुशखबर : राज्यातील जिम लवकरच सुरु होण्याची शक्यता शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, …
Read More »आता घरबसल्या घ्या सिध्दीविनायकाच दर्शन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धी विनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन
मुंबई: प्रतिनिधी सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी …
Read More »मुख्यमंत्री, उद्योजक, कारखानदार असणा-या समाजाला मागासवर्गाचे आरक्षण कसे? मराठा समाजाच्या मतांच्या फायदासाठीच आरक्षण: अॅड सदावर्ते
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण लागू करणे कसे अयोग्य आहे? …
Read More »शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, परिक्षा घेण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार सरकारचा निर्णय परिक्षा रद्दचा नव्हताच ऐच्छिक परिक्षा आहेच
मुंबई : प्रतिनिधी ३० सप्टेंबर पूर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी न्यायालयाच्या निकालाचा आपण आदर करत असून परिक्षा घेण्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत निर्णय घेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “हा निकाल देतानाच न्यायालयानं सांगितलं …
Read More »मंत्र्यांसह सर्वांनी आधी कोरोनाचा टेस्ट रिपोर्ट दाखवा मगच विधानभवनात प्रवेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला सविस्तर आढावा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी ५ व ६ …
Read More »कृषी संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे केंद्रीय कृषीमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेती क्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. केंद्र शासनाने शेती …
Read More »महसूल राज्यमंत्री सत्तार यांचेही निवडणूक प्रतिज्ञापत्र वादाच्या भोवऱ्यात प्रत्येक निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती
पुणे-मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात माहिती लपविल्याने प्रकरणी पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशी दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सध्याचे विद्यमान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक माहितीचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे नेमके शिक्षण किती असा सवाल डॉ.अभिषेक हरिदास यांनी …
Read More »रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे “लक्ष्मीदर्शन” करतेय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून “टोल” गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली तर नाही ना? मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करुन “लक्ष्मीदर्शन” तर करीत नाही ना? फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? , अशी टीका भाजपा नेते आमदार …
Read More »
Marathi e-Batmya