मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार” व “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …
Read More »वाहतूकक्षेत्राला दिलासा : माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना ७०० कोटींची कर माफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वाहनांना १०० टक्के करमाफी दिल्याने सरासरी ७०० कोटी रूपयांची करमाफी मिळणार आहे. दिनांक १ एप्रिले …
Read More »मुंबई महानगरातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR Region) ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या प्राधिकरणाचे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (MMR-SRA) चे मुख्यालय ठाणे …
Read More »शेखर चन्ने, तुकाराम मुंडे यांच्यासह १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अण्णासाहेब मिसाळ कोकण विभागाचे नवे विभागीय आयुक्त
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज प्रमुख १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह शेखर चन्ने, अण्णासाहेब मिसाळ, लोकेश चंद्रा यांच्यासह अन्यांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांची बदली जलसंधारण …
Read More »महाडमधील त्या इमारतीतील ७८ व्यक्ती सुखरूप तर मृतकांची संख्या १० वर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरु
महाड: प्रतिनिधी येथील तारिक गार्डन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९७ व्यक्तींपैकी ७८ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून ते सुखरूप आहेत. या दुर्घटनेत संध्याकाळपर्यत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, …
Read More »विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …
Read More »किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प प्रलंबित असताना व हजारो झोपडपट्टी धारकांचे भाडे थकलेले असताना त्यांच्या हक्काचे एक हजार कोटी रुपये चुकीचे निर्णय घेऊन इतरत्र वळविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याचा आरोप करून अन्य महामंडळाचे नाही तर किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत करा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर …
Read More »राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या बाबत भांडारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या. त्याअंतर्गतच राज्यातंर्गत प्रवासावरही बंदी घातलेली. मात्र …
Read More »शिथिलता दिली मात्र सतर्क राहणे गरजेचे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगत . लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. …
Read More »गणेश विसर्जन करायचाय ? मग पालिकेच्या फिरता कृत्रिम तलावात करा मुख्यमंत्री ठाकरेंकडून पाहणी आणि कौतुक
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले. तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन …
Read More »
Marathi e-Batmya