मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …
Read More »एकाच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्रातील चिपळूण, सोलापूरात जातीयवादाच्या दोन मोठ्या घटना चिपळूणात मागासवर्गीयांना निवारा लांब करायला लावला, तर माळशिरसमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीस करण्यास नकार
सोलापूर-रत्नागिरी-मुंबई: प्रतिनिधी फुले, शाहू आणि राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून उल्लेख केला जातो. मात्र याच महाराष्ट्रात एकाच महिन्यात जातीवादाच्या दोन घटना घडल्या असून त्यातील एक चिपळूण तर दुसरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे एका मातंग समाजाच्या व्यक्तीने अॅट्रोसिटी …
Read More »काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच केली मंत्री केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फीची मागणी काँग्रेस संसदीय समितीचे सदस्य डॉ.आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर- मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य तीन बँकांना ८०० कोटी रूपयांचा चुना लावला आहे. विशेष म्हणजे स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलच्या अध्यक्षालाच सरकारी वकील म्हणून नियुक्त करून स्वत:चा बचाव करत असून सदरचा सरकारी वकील बदलावा आणि पदुम …
Read More »कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून …
Read More »नारायण राणेंची एकाबाजूला मुख्यमंत्र्यांवर टीका तर दुसऱ्याबाजूला आवाहन मी घरातून काम करत नाही आणि डावीकडे उजवीकडे बघून उत्तर देत नाही
मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही. तसेच, मी घरात बसून काम करत नाही आणि व्यासपीठावर डावीकडे, उजवीकडे पाहून उत्तर देत नसल्याची उपरोधिक टीकेची झोड केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर उठवित गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करत बसण्यापेक्षा बेरोजगार झालेल्यांना पुन्हा …
Read More »रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त …
Read More »ज्या स्व. बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याच चिंरजीवांनी सत्तेसाठी गुडघे टेकले भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले असून काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरींच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर सिताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क- कस्तुरचंद पार्क सेक्शन मेट्रो मार्गाचे उद्घाटन
नागपूर : प्रतिनिधी रस्ते बांधणीच्या कामात शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधीकडून अडथळा आणला जात असल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित याबाबतची नाराजी व्यक्त करत रस्ते विकासाच्या कामांना मंजूरी देताना विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिला. त्याच पत्राचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नितीनजी तुम्ही …
Read More »तातडीने पाऊले उचला, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर!
मुंबई: प्रतिनिधी उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात यावीत तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
Read More »सणासुदीच्या काळात कोरोनादूत बनू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी आगामी दिवस हे सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये कोविडदूत म्हणून काम करू नका आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण देवू नका असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत निर्बंध शिथील केलेले असले तरी नागरीकांनी पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या …
Read More »
Marathi e-Batmya