Tag Archives: cm uddhav thackeray

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुख्यमंत्र्यांनी घेतली कोविड संदर्भात प्रमुख उद्योजक आणि चित्रपट-दूरचित्रवाणी निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे …

Read More »

कोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे  कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात …

Read More »

BreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील १० दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तरीही अपेक्षेइतकी रूग्णसंख्येत घट होत नसल्याने १५ जून पर्यत निर्बंधात वाढ करण्यात आली होती. परंतु ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच ७ जून २०२१ अर्थात सोमवारपासून BreakTheChain अंतर्गत निर्बंध शिथील करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून …

Read More »

मराठा आरक्षण प्रकरणी भोसले समितीने केली ही शिफारस अशोक चव्हाण यांची माहिती; भोसले समितीचा अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पूनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने अलाहाबाद उच्च …

Read More »

फडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची निवृत्तीनंतर एक वर्षासाठी समृध्दी महामार्गाच्या समितीवर नियुक्ती करत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस यांचे लाडके म्हणून मोपलवारांना ठाकरे सरकारने थेट चवथ्यांदा मुदतवाढ दिल्याने एकाबाजूला निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारायची दुसऱ्याबाजूला …

Read More »

मंत्री वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयात केवळ वेळेचा अभाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनलॉक जाहिर करण्यावरून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली परस्पर वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही असे सांगतानाच वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती …

Read More »

म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता …

Read More »

अखेर बारावीच्या परीक्षा रद्द ! मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा करत १२ वीची परिक्षाही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे अनलॉकबाबत वडेट्टीवारांना युटर्न घ्यावा लागला. परंतु त्यांनी केलेली १२ वीची परिक्षा रद्दची घोषणा अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

नवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु एमएमआरडीए आयुक्त ए.राजीव हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर …

Read More »

वडेट्टीवारांचे “अनलॉक” तर सीएमओचे “प्रस्ताव विचाराधीन” राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन-मुख्यमंत्री कार्यालय

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजी पासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर १ जूनपासून पॉझिटीव्हीटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने मान्यता देत निर्बंध कडक ठेवण्याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्याच दोनच दिवसांचा कालावधी लोटला नाही तोच आज मदत व पुर्नवसन मंत्री …

Read More »