Tag Archives: contract labor

चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. याबाबत आशिष शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, सरकार हे सैंविधानिक नियोक्ता, बाजारातील खेळाडू नाही आऊटसोर्सिंग करून कामगारांचे शोषण करू शकत

सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की सार्वजनिक संस्था आर्थिक ताण किंवा रिक्त पदांचा अभाव दर्शवून दीर्घकालीन तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण किंवा मूलभूत वेतन समानता नाकारून शोषणाचे साधन म्हणून नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग वापरू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने अलिकडच्या निकालात पुढे असेही सांगितले की, आणखी …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय सावित्रीबाई फुले स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद, गोसीखुर्दसाठी २५ हजार कोटी रूपयांची तरतूद, कामगार संहिता

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जवळपास ८ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या गोसीखुर्द धरणाच्या ऱखडलेल्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार संहिता नियमास मान्यताही देण्यात आली. विभागीय …

Read More »

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागणार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले. नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या …

Read More »

गिग अर्थव्यवस्थेप्रमाणे सरकारी संस्थांनी कंत्राटी नोकर पद्धतीचा अवलंब करू नये सर्वोच्च न्यायालयाचा कंत्राटी नोकर भरतीबाबत मोठा निर्णय दिला

महाराष्ट्रासह देशातील अनेक सरकारी संस्था-विभागांकडून आर्थिक कारण पुढे करत विविध स्तरावरील नोकऱ्यांच्या रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात तर १ लाख ५० हजार रिक्त जागा असतानाही यातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी भरतीबाबत मोठा …

Read More »

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांची थकीत पीएफ रक्कम जमा न केल्यास थेट बेस्टवर कारवाई करा कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांचे आदेश

नियुक्त कंत्राटदारांने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ-भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा त्यांच्या वेतनाचा लाभही द्या

अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे …

Read More »

बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करण्याचे आदेश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले आदेश

कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई …

Read More »

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब त्यांची देणी तातडीने देण्याची खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी

मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद …

Read More »