राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, बहुप्रतिक्षेत असलेली कृषी समृद्धी योजना राबवण्यास मान्यता बळीराजाच्या उन्नतीसाठी कृषीमंत्र्यांचे आश्वासक पाऊल, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, विमा निकषात सुधारणा करणार द्राक्ष पिकांचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणार
द्राक्ष पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची व्याप्ती व निकष बदल करण्याबाबत करण्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मंत्रालयात द्राक्ष बागायतदार संघटनांच्या अडचणी, फळ-पीक विमा योजना, अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकांच्या नुकसानीसाठी द्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूरात लाभार्थ्यांची निवड योजनेत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन
महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात पावनेतीन लाख तर राज्यात बत्तीस लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, रब्बीचं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठाचं नियोजन राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. म्हणून यंदा रब्बी पिकाखालचं क्षेत्र ६५ लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील रब्बी हंगामाचे …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ
महाडीबीटी पोर्टवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेंव्हा, या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. तसेच कृषी यंत्रे/औजारांवरील जीएसटी च्या …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा माहिती, शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणिकरण संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार
राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतक-यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतक-यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालय …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेद्वारे नवा अध्याय महाराष्ट्रातील ९ जिल्ह्याची निवड
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. केंद्र सरकारने राज्यातील ९ जिल्ह्यांचा यात समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्या दिल्लीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त …
Read More »मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता …
Read More »सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा ऑगस्ट मधील नुकसानाची मदत मंजूर, सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच देण्यात येईल
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya