Tag Archives: deputy chief minister

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष… समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्- उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत …

Read More »

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास २५ हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक …

Read More »

अजित पवार यांची माहिती, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे २५०० कोटी अनुदान… शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल सी.पी राधाकृष्णन

शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल …

Read More »

‘सारथी’ च्या कार्यालयासह २२५ कोटींच्या विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ५०० मुले ५०० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह

नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी च्या १५६ कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, ५०० मुलांची व ५०० मुलींची वसतिगृह इमारत तसेच ४३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश,… सिंचन क्षमता वाढवा राज्यातील २१ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »

अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसची पोलिसात तक्रार फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न- काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवा पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य …

Read More »

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने सामुदायिक आरोग्य शिबिरे २५ हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, विमा संरक्षण… जीएसटी रद्द करण्यासाठी शासन मदत करणार

द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल. अवेळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष व फळबागांनाही प्लॅस्टीक आच्छादनांसाठी अनुदान …

Read More »