हिंदू विवाह कायद्यातंर्गत घटस्फोटापूर्वी बंधनकारक असलेला सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची विभक्त पत्नी धनश्री वर्मा यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केली. तसेच या याचिकेवर तातडीने गुरुवारी सुनावणी घेण्याचेही आदेश दिले. युजवेंद्र चहल आणि धनश्री गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत आणि पोटगी …
Read More »पती विरोधात खोटी तक्रार उच्च न्यायालय म्हणते, कौटुंबिक न्यायालायचे आदेश योग्य सुसंवादी नातेसंबधात स्थान मिळवू शकत नाही
केवळ पतीचे वर्तन सुधारण्यासाठी पत्नीने तिच्या पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे हे विवाहित जोडप्यांच्या सामान्यपणे राखल्या जाणाऱ्या सुसंवादी नातेसंबंधात स्थान मिळवू शकत नाही आणि ती क्रूरताच ठरेल, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त करत याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दिलेला योग्यच असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः बायको कमावती असली तरी घटस्फोटानंतर देखभाल खर्च आवश्यक देखभाल खर्च आणि पोटगी प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, घटस्फोटानंतर, विशेषत: विवाह दीर्घकाळ टिकून राहिलेल्या प्रकरणांमध्ये, सन्मान, सामाजिक स्थान आणि आर्थिक स्थैर्य सुरक्षित करणे आवश्यक असल्यास पक्षाचे आर्थिक स्वातंत्र्य असूनही देखभाल मंजूर केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणारे पत्नीचे अपील फेटाळून …
Read More »न्यायालयाचे स्पष्टोक्ती, घटस्फोटासाठी दिलेली संमती क्रूरतेचा गुन्हा रद्द करण्याचा आधार नव्हे पतीची मागणी फेटाळाना उच्च न्यायालयाचा निर्वाळा
परस्परसहमतीने घटस्फोट घेण्यासाठी दिलेली संमती पत्नीने मागे घेणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होत नाही आणि तिने पतीविरुद्ध दाखल केलेली क्रूरतेची तक्रार रद्द करण्याचे कारणही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. हिंदू विवाह कायद्यातील कलमानुसार,परस्परसहतमीने घटस्फोट घेण्यासाठी दिलेली संमती घटस्फोट मान्य होण्यापूर्वी मागे घेण्याचा अधिकार पती-पत्नी दोघांनाही अधिकार आहे. या प्रकरणातही …
Read More »वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक रिपोर्ट नुसार भारतात घटस्फोटाचा टक्का किती ? 'ही' आहेत भारतीय घटस्फोटासाठी प्रमुख कारण
भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र भारतात तयार झाल्याचे दिसून आले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल सामान्य झाले असून मात्र, आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा टक्का कमी आहे. आजही भारतात …
Read More »सानिया मिर्झाच्या सूचक पोस्टने पती शोएब मलिक सोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण सानिया मिर्झाच्या पोस्टने नेटकऱ्यांचे घेतले लक्ष वेधून
भारताची माजी टेनिस पटू सानिया मिर्झा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते मात्र कालांतराने सानिया मिर्झा हिने आपल्या मुलाचा व पतीचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र पुन्हा एकदा माजी टेनिसपटूने अलीकडेच …
Read More »
Marathi e-Batmya