मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला आहे. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. …
Read More »बोम्मईंशी नेमकं कोण बोललं? उपमुख्यमंत्री फडणवीस की, मुख्यमंत्री शिंदे फडणवीस म्हणतात बोम्मईंशी मी बोललो, पण बोम्मई म्हणतात मुख्यमंत्री शिंदेंनी फोन केला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक उफाळून आला. त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये आणि महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याचे सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले. तसेच कर्नाटकातील कन्नड राष्ट्र वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. अखेर या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मुंबईतल्या ‘या’ १८७ कामांचा शुमारंभ होणार मुंबईचा कायापालट मिशन मोडवर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, उद्या ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या एकाचवेळी १८७ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे ग्वाही, कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार देणार कोकण महोत्सवात दिले आश्वासन
“कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी …
Read More »सीमावाद चिघळलाः महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात दगडफेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मईंना केला फोन
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. तसेच उचकाविण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यातच महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगांवात जाणार असल्याचे जाहिर केल्यानंतर या मंत्र्यांनाच अटकाव करणारे आदेश कर्नाटक सरकारने जारी केले. या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्राच्या वाहनांवर बेळगांव जवळील हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर कन्नड रक्षण …
Read More »उध्दव ठाकरेंचा इशारा, राज्यपाल आणि नेभळट शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा
मागील काही दिवसांपासून राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या अवमानाच्या आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर एक चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, उद्योगांना एक खिडकी योजनेतून परवानग्या महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण
सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित परिषदेस …
Read More »देवेंद्र फडणवीसांच्या सारथ्याखाली मुख्यमंत्री शिंदेनी केली समृध्दीची पाहणी
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?
मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …
Read More »संभाजी राजे यांचा इशारा, तर उठाव होणारच…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा केले. त्यातच शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केल्याने संभाजी राजे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यांरींना काढून टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली नसल्यान अद्याप त्यांनी केलेल्या काही …
Read More »
Marathi e-Batmya