काल रात्री उशीरा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर देशातील त्यांच्या उद्योगाचा विस्तार आणि त्यांच्या प्रती जनसामान्यांसह उद्योग विश्वात असलेल्या आदराप्रती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक दिवसाचा दुःखवटा जाहिर केला. हा दुःखवटा जाहिर केल्यानंतर सर्व शासकिय कार्यक्रम रद्द करण्यात येतात आणि पुढे ढकलण्यात …
Read More »राज्य मंत्रिमंडळाची उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली, भारतरत्न देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी …
Read More »उद्योजक मार्गदर्शक रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्योग आणि राजकारण्यांची रिघ एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले रतन टाटा यांचे पार्थिव
बुधवारी (९ ऑक्टोबर २०२४) रात्री उशिरा रतन टाटा यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस ८६ होते. टाटा यांना सोमवारी (७ ऑक्टोबर, २०२४) दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वय-संबंधित समस्यांमुळे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री रतन टाटा यांचे निधन झाले. उद्योगपती रतन …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …
Read More »रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढः आयटीआय संस्थांचे नामकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) या योजने अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची रमाई आवास योजना (ग्रामीण) व आदिवासी विकास विभागाची शबरी आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत साधारण क्षेत्र …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे
राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी करत याभागात भिती आणि दहशतीवर …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, लुटीसाठी बीएमसीची निवडणुक घेत नाही का? अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम
‘मुलुंड मध्ये पीएपी प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे. पण धारावी प्रकल्पात ७०% जमीन बीएमसीची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, लाडकी बहीणीच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक पोलिस पाटलांचे मानधन १५ हजार केले
पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील …
Read More »चेंबूरमधील आगीत कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट
चेंबूरमधील सिद्धार्थ नगरातील घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाच घरातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी येथील चाळीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या दुर्घटनेत एकाच घरातील सात …
Read More »
Marathi e-Batmya