सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या पहिल्या २० उमेदवारांच्या यादीत या उमेदवारांना संधी प्रकाश यलगुलवार यांच्या सुनेला, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रतिक्षा प्रविण निकाळजे यांना पुन्हा उमेदवारी

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली.

महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे.

काँग्रेस पक्षाकडून जाहिर करण्यात आलेल्या पहिल्या २० जणांच्या यादीत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या स्नुषा सीमा मनोज यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, चेतन नरोटे, सबा परवीन आरिफ शेख, प्रतिक्षा प्रविण निकाळजे, रियाज हुंडेकरी आदी जणांना काँग्रेस पक्षाकडून विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. या नगरसेवकांसह २० जणांना काँग्रेसने उमेदवारी जाहिर केली आहे.

काँग्रेसने जारी केलेली यादी खालीलप्रमाणे…

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *