Tag Archives: farmers protest

भाजपाच्या खट्टर सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार लाठीमारात १० शेतकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी …

Read More »

शेतकरी आंदोलन आणि वाहतूक कोंडीवर न्यायालयाचे केंद्र- उत्तर प्रदेश सरकारला आदेश रस्ता खुल्या करण्याबाबत पर्याय शोधून सांगा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे रस्त्यात अडथळा निर्माण करण्यात आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यां प्रवाशांना अडचण होत आहे. हा प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त केंद्र सरकार आणि संबधित राज्य सरकारच्या हातात असून त्या अनुषंगाने तात्काळ पर्याय शोधून …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ? आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय?

नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलन जीवी अशी उपाहासात्मक टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यसभेतील भाषणात केली. तसेच आंदोलनाला परदेशातून वाढता पाठिंबा पाहून देशातील मोदी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर एफडीआय अर्थात फॉरेन डिस्ट्रीक्टीव्ह आयडोलॉजी अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या …

Read More »

… तर लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना पवारसाहेबांचा उल्लेख केला. …

Read More »

भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतमालाची लूट करणारा पक्ष मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा मोदींचा डाव - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी मोदी – शहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी… आवाज दो हम एक है… जय जवान जय किसान… भारत माता की जय… किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का …

Read More »

नसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही? असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत …

Read More »

… अमेरिकेतील जगप्रसिध्द गायिकेकडून पंतप्रधान मोदींसह भारतीय कलावंताना प्रश्न आपण यावर चर्चा का करत नाही ? असा सवाल प्रसिध्द गायिका रिहानाकडून उपस्थित

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमावर्ती भागात आणि संबध भारतात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत देशातील मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चिडीचुप असताना अमेरिकेतील जगविख्यात गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाची बातमी ट्विट करत आपण यावर का बोलत नाही? असा सवाल …

Read More »

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. शेतकर्‍यांसाठी बंदोबस्त लावताय की चीन सीमेवर की पाकिस्तान सीमेवर बंदोबस्त लावताय अशी विचारणा करतानाच जनरल डायर …

Read More »

केंद्राच्या दडपशाही विरोधात ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा चक्का जाम शेतकरी नेत्यांनी दिली हाक

मुंबईः प्रतिनिधी दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने …

Read More »

दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

गाझीपूर (उ.प्र): प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी करत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते …

Read More »