Tag Archives: Harshwardhan Sapkal

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने संविधान व गांधी विचार स्विकारावा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाहिरातीवरून माफी मागण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत भाजपाने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले, मतचोरांना आता जनताच शिक्षा देणार: विजय वडेट्टीवार.

भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना …

Read More »

उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांची ग्वाही, राज्यघटनेचे संरक्षण करणार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार

उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? मुंबईतील आजच्या परिस्थितीस फडणवीस सरकारच जबाबदार; मराठा आंदोलकांना बदनाम करू नका

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची सूचना, राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत …

Read More »