राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …
Read More »शनिवार वाड्यात नमाज पठण ? भाजपा खासदार मेधा कुलकर्णी पतित पावनच्या कार्यकर्त्यांसोबत गोमूत्र शिंपून जागेचे शुद्धीकरण केले
उभ्या महाराष्ट्राला मनूवादी विचारणीची ओळख आणि त्याची शिल्लक अवशेष असलेल्या पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यानी रा. स्व.संघ प्रणित पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाड्यातील त्या जागेचे गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच …
Read More »महात्मा गांधीजी आणि मानवता उपसंचालक प्रवीण टाके यांचा महात्मा गांधी जयंती निमित्त खास लेख
२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कृतींमध्ये मानवतेचे मूर्त रूप आहे. ज्यामुळे त्यांचे जीवन हे केवळ राजकीय संघर्षाचे वर्णनच नाही, तर मानवतेच्या नात्याने केलेल्या अनेक प्रयोगांचे आणि त्यातून उमटलेल्या आदर्शांचा संग्रह आहे. दोन ऑक्टोबरला त्यांच्या …
Read More »होळी उत्सवाच्या दरम्यान राजापूरात घडले काय? आ निलेश राणे यांनी केले आवाहन मस्जिदीचे गेट तोडून काही समाजकंटकाकडून सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न
कोकणातील शिमगा अर्थात होळी सणाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच स्थानिक ग्रामदैवताच्या पालक्याही फिरवत त्याची मिळवणूकही काढली जाते. कार रात्री शिमगा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामदेवतेचे पालखीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर असलेल्या एका मस्जिदीतचे बंद असललेले गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर …
Read More »रमेश चेन्नीथला यांची टीका,…म्हणून नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तानची भाषा
लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी …
Read More »मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी
नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार …
Read More »शरद पवार यांचा इशारा, …तर याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी …
Read More »संजय राऊत यांचे टीकास्त्र, हिंदुत्वाच्या नावावर टोळ्या निर्माण करून… राज्यातील सलोखा पध्दतशीर बिघडविण्याचा खेळ सुरु
आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील आम्ही ढोंगी नाही सांगतानाच त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं आणि त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू …
Read More »त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे? मुंबईतील २४०४ मंदिरे व ११४४ मशिदीपैंकी ९२२ मशिदी व केवळ २० मंदिराकडे भोंग्यांची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरत आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे, पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे हिंदूचेच अधिक नुकसान …
Read More »केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा अनं हिंदूंचा नाही, हे चालणार नाही: राजचे भाषण सुखावणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. …
Read More »
Marathi e-Batmya