मराठी ई-बातम्या टीम कोरोनाची तिसरी लाट असूनही देशाची अर्थव्यवस्था चमकेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असेल. तर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ८ ते ९ टक्के दराने वाढू शकतो, असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या मते, या वर्षात संपूर्ण जगाचा जीडीपी ५.५% दराने वाढू शकतो. …
Read More »भारतीयांसाठी खुषखबर, देशाची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकणार सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात दावा
मराठी ई-बातम्या टीम कोरोनामधून जागतिक अर्थव्यवस्था आता सावरत असल्याचे दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकून सहावे स्थान मिळवेल, असा दावा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात करण्यात आला आहे. जागतिक आर्थिक उत्पादन २०२२ मध्ये १०० ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. यासह भारत फ्रान्सला मागे टाकत …
Read More »१६ डिसेंबर अखेर किती लाख कोटींची रक्कम केंद्राच्या तिजोरीत जमा झाली? जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, कर संकलनात ५३.५० टक्के वाढ
मराठी ई-बातम्या टीम अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर केंद्र सरकारकडून चांगली बातमी आली आहे. सरकारला करापासून घशघशीत महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या वर्षात १६ डिसेंबरपर्यंत आगाऊ कर संकलन ४,५९,९१७ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ५३.५० टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, २०२१-२२ साठी १६ डिसेंबर पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर …
Read More »या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात ७ महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण कोरोना व्हेरिएंटमुळे घसरण झाली बाजारात
मुंबई: प्रतिनिधी सेन्सेक्सने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६५० अंकांची घसरण नोंदवली. याचे मूळ कारण कोरोनाचे नवीन प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ७ महिन्यांतील बाजारातील ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. १८ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स ६१,७६५ वर बंद झाला. तो जानेवारीत ४८ हजारांवर बंद झाला. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर रोजी …
Read More »… तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची भीती
मुंबई: प्रतिनिधी रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडून आकलन चुकीचे …
Read More »सोने आयातमध्ये ७२ टक्के वाढ व्यापार तूटीतही वाढ
नवी दिल्लीः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये देशाची सोन्याची आयात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढून ३.३९ अब्ज डॉलरवर गेली आहे. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सोने आयातीमुळे या महिन्यात व्यापार तूटही वाढून ती १४.८८ अब्ज डॉलरवर पोचली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये १०.५५ अब्ज डॉलरची ही तूट होती. त्यात आणखी ४ अब्जची वाढ झाली आहे. देशाची निर्यात डिसेंबर महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून २७ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर एकूण आयातीत २१.१ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात ४१.९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. डिसेंबरमध्ये तेलाच्या आयातीचे बील ३५ टक्के वाढून १०.३५ अब्ज डॉलर झाले आहे. याअगोदरच्या महिन्यात ९.५५ अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होते. दरम्यान, इंजिनिअरींग वस्तू आणि ऑयल प्रोडक्ट्सची निर्यात डिसेंबरमध्ये २५ टक्के वाढली आहे. तर तयार कपड्यांची निर्यात मात्र ८ टक्क्याने घटून १.३३ अब्ज डॉलरची राहिली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने तेल आयातीवरचा खर्च वाढल्याचे सरकारने म्हटले आहे. एप्रिल – डिसेंबर दरम्यान निर्यात वाढली एप्रिल – डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१.०५ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत देशाची निर्यात २२३.५१२ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील वर्षीच्या याचकालावधीत १९९.४६७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यात आयात २१.७६ टक्के वाढून ३३८.३६९ अब्ज डॉलरवर पोचली आहे. Share on: WhatsApp
Read More »औद्योगिक उत्पादन आणि महागाईने गाठला उच्चांकी स्तर एकाबाजूला खुशी तर दुसऱ्याबाजूला गम
नवी दिल्ली: प्रतिनिधी चलन निश्चिलीकरणानंतर लगेच देशात लागू केलेल्या जीएसटी करप्रणालीचा परिणाम देशातील सर्वच लहान-मोठ्या उद्योगांवर झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. मात्र नोव्हेंबरमध्ये ओद्योगिक क्षेत्राने चमकदार कामगिरी दाखवित या महिन्यात औद्योगिक उत्पादन २५ महिन्यांच्या उच्चांकावर पोचले. तर औद्योगिक उच्चांकाबरोबरच महागाईनेचे चांगलाच उच्चांकी दर गाठल्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेसाठी कभी खुशी …
Read More »२०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहणार? नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात जागतिक बँकेचा अंदाज
मुंबई: प्रतिनिधी गेल्या वर्षभरात चलन निश्चलीकरण आणि जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे भारताची आर्थिक गाडी घसरल्याचा अंदाज देशातील सर्वच तज्ञांनी व्यक्त केला. तसेच त्याचे प्रतिबिंब बाजारातही उमटले. मात्र जागतिक बँकेने मात्र २०१८ हे वर्ष भारतासाठी आश्वासक असल्याचे चित्र मांडत भारताचा विकास दर ७.३ वर पोहचेल असा विश्वास २०१८ ग्लोबल इकॉनामिक्स अहवालात …
Read More »
Marathi e-Batmya