कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून …
Read More »“ठाकरे सरकारला झुकावं लागेल”, असे म्हणत सोमय्या कोल्हापूरकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सीएसटीएमहून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू
मुंबई : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल …
Read More »माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक मंत्रालयात कामगार …
Read More »अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …
Read More »पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …
Read More »राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हे आव्हान निवडणूकीतील डिपॉझिट जप्त करण्याची ताकद
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला …
Read More »मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक …
Read More »“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर
मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …
Read More »१ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना देणार दप्तरे कोल्हापूरात ४९ हजार तर सांगलीत २८ हजार विद्यार्थ्यांना दप्तरे देणार
मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार …
Read More »शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह हेक्टरी ६० हजार मदत द्या मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे केली. …
Read More »
Marathi e-Batmya