Breaking News

Tag Archives: maharashtra

वाजतगाजत गणपतीला निरोपः भक्तांकडून पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विसर्जन दुपारपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि गणेशभक्तांचा जल्लोष

मागील १० दिवसांपासून हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या गणपती-गौरीला पूजत गणेशोत्सव साजरा केला. या १० दिवसांच्या कालावधीत अनेक वाईट गोष्टीपासून दुर राहण्याचा संकल्प करत अनेकांनी मनोभावे पूजा करत गणपती आणि गौरीचा आज सन्मानपूर्वक निरोप दिला. तर अनेक गणेश भक्तांनी आणि गणपती मंडळांनी गणपतीला पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विधिवत समुद्राच्या पाण्यात, कृत्रिम …

Read More »

… पण महायुतीत अजित पवार यांना बाजूला काढण्याच्या प्रयत्नात शिंदे आणि भाजपा एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार

राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनंतर निवडणूकीच्या प्रत्यक्ष हालचाली सुरु होतील असे सांगत निवडणूकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यभात या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करण्याच्या …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्र हरयाणातील शेतकऱ्यांना असाही खुष करण्याचा भाजपाचा प्रयत्न निर्यातीवरील मार्केट कॅप काढली

हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. यातील हरयाणात सत्ताधारी भाजपाला बाहेरचा रस्ता स्थानिक जनतेकडून दाखविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची घोषणा होणे अद्याप बाकी असले तरी येथील वातावरणही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग भाजपावरील असंतोष कमी करण्यासाठी …

Read More »

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गोल-गोल वर्तुळ पुन्हा तेच चेहरे- पण पक्ष बदलेले

कधी काळी सांसारीक जीवनातील व्यक्तींकडून त्यांच्या पुढच्या पिढीला नेहमी एक शहाजोगपणाचा सल्ला देत असत, की जग-दुनिया गोल आहे. जे आपण इतरांना देतो, ते पुन्हा आपल्याकडेच येत. काही वर्षांपूर्वी अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीपासून राज्यात् कायम सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाकडून करण्यात येऊ लागले. तसेच …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा दावा, एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक

देशातील एकूण परकीय गुंतवणूकीची एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि …

Read More »

महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …

Read More »

विधानसभा निडणूकीची प्रशासनाकडून तयारी सुरु; ऐन गणेशोत्सवात आचारसंहिता ? महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणार विधानसभेच्या निवडणूका

मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचा माहोल बनविण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरु झालेला आहे. सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून सध्या समाजातील विविध समाजघटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी जाहिरनाम्यातील अनेक घोषणा थोड्याशा बदल करत जाहिर …

Read More »

अजित पवार यांच्या ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समन्वयकांची नेमणूक राज्यातील दौऱांची जबाबदारी या पदाधिकारी आणि मंत्र्यांवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे …

Read More »

निवडणूकांच्या तोंडावर भाजपाच्या मंत्र्यांकडून “संविधान मंदिर” कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध वर्गातील मतदारांना खुष करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपाच्या एका मंत्र्यांनी तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेषतः दलित मतदारांना खुष करण्यासाठी आयटीआयच्या प्रत्येक कॉलेजमध्ये संविधान मंदिर उभारण्याची योजना जाहिर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय …

Read More »