मराठी माणसाला न्याय मिळायला हवा असा दावा करून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी सूर सापडलाच नाही. शिवसेना आणि सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्ष झेंड्यातून हिरवा रंग कधी गायब झाला आणि त्यांचे इंजिन रुळावरून कधी घसरले याचा …
Read More »“मुस्लिम द्वेषाच्या धंद्यावर राजकारण” म्हणत मनसे नेते इरफान शेखचा राजीनामा चला माझ्याबरोबर मदरशात काय चालते ते दाखवतो
गुढी पाडव्याच्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून टोकाची भूमिका घेत मुंबईसह मुंब्ऱ्यातल्या मदरशांवर धाडी घालण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून पुण्याचे मनसे नेते मोरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर एका मुस्लिम मनसैनिकाने राजीनामा दिला. त्यानंतर आज मनसेचे प्रदेश सचिव नेते …
Read More »राजच्या मदतीला देवेंद्र? काश्मीर फाईल्स आणि ३७० वरून साधला पवारांवर निशाणा १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या संख्येवरूनही साधला निशाणा
गेले काही दिवस मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता त्यात भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट, ३७० कलम आणि मुस्लिम धार्जिण्या वक्तव्यावरून शरद पवारांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवारांनी जवळपास दोन …
Read More »मनसेने जारी केले पुरंदरेंसह सात इतिहासकारांचे “ते” पत्र, हे माहित नव्हते का? पवारांनी माफी मागावी केली मागणी
गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार हे कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, कारण त्यांना हातची मुस्लिम मते जातील अशी भीती वाटते असा गंभीर आरोप केला. त्यास उत्तर देताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी फुले-शाहू-आंबेडकरांनी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजपाचे हिंदूत्व हा भाजपाचा श्वास असल्याची कबुली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे …
Read More »पवारांची राजवर टीका, काय पोरकट आरोप ‘अजित पवार आणि मी वेगळे नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारासंबधी वक्तव्यावर शरद पवारांची टीका
भाजपाबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपाने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर करत महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा …
Read More »शरद पवारांचे राज ठाकरेंना मुद्देसुद प्रत्युत्तर, मी तुमच्यासारखे धर्माचे प्रदर्शन करत नाही माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श;आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं...
मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली. गैरफायदा घेणार्याला …
Read More »“राज” इशारा, ३ तारखेपर्यंत भोंगे काढा अन्यथा… ठाण्यातील उत्तर सभेत मला धार्मिक दंगे नकोत
राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात मस्जिदीवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून हे सर्व भोंगे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मग या आदेशाची अंमलबजावणी राज्याच्या गृह विभागाने करायला नको का असा सवाल करत जसे आपण रस्ते घाण झाले की आपण स्वच्छ करतो मग कानाला त्रास व्हायला तर भोंगे काढायला नको …
Read More »राज ठाकरे म्हणाले, पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर धाडी ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेत टीका करांना दिले उत्तर
मनसेची पाडवा सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यावर टीका केली. त्या सगळ्यांनी संपलेल्यांबद्दल बोलत नाही म्हणत सगळेच संपलेल्या पक्षाबद्दल बोलत राहीले. मनसे हा संपलेला पक्ष नाही तर दुसऱ्यांना विझविणारा पक्ष असल्याची टीका करत पवारांना ईडीची नोटीस येणार असल्याची कुणकुण लागताच काय नाटक केलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर …
Read More »मनसेवर आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा म्हणाले, स्टंटबाजी आणि संपलेल्यांवर बोलत नाही शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा मनसेने लावली
मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेने भाजपाची भूमिका स्विकारल्यानंतर भोंगे न काढणाऱ्या मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. आज राम नवमीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला डिवचत शिवसेना भवनासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावली. त्यामुळे पोलिसांनी मनसेचे भोंगे जप्त करत मनसैनिकांना ताब्यात घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना …
Read More »
Marathi e-Batmya