Tag Archives: modi government

एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र फडणवीसजी ती चूक करू नका माजी अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांना सुचवले गांधीजींचे विचार...

महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र …

Read More »

नाना पटोलेंची अर्थसंकल्पावर टीकाः आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने २०२२ मध्ये शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचे काय झाले?

अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, देश बदलतोय… मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक

भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्यानंतर आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यसभा आणि लोकसभा सभागृहाच्या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, आपला देश बदलत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …

Read More »

बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट ट्विटर आणि युट्यूबवर ब्लॉक मोदी सरकारच्या आदेशानुसार समाजमाध्यमांवर ब्लॉक केल्याची माहिती

गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी हे असताना गुजरातदंगल झाली. त्या दंगलीत अनेक मुस्लिमांचे शिरकाण करण्यात आले. तसेच ग्रोधा येथे प्रवाशांसह रेल्वे एक्सप्रेस जाळण्यात आली. तसेच याच दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्काराचे दुर्दैवी प्रकरणही घडले. त्यानंतर गुजरातमधील दंगलीवरून अनेक चित्रपट आणि अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या. त्या सगळ्यांमध्ये त्यावेळच्या …

Read More »

काँग्रेसचा आरोप, मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्र सरकार असमर्थ

यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, मोदी सरकारने कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व अधिकार दिले पण मोदी सरकारने कामगार चळवळीचे अस्तित्व संपवण्याचे काम केले असून मालकधार्जिणे कायदे आणून कामगार …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल, नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात …

Read More »