पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना …
Read More »१ लाख कोटी महसूल तूटीचा तर ६ लाख कोटी खर्चाचा निवडणूक अर्थसंकल्प सादर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट
महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी ३६ कोटींचा निधी, २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा… खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराचा कायदा करणार का?
पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती,… फडणवीस आणि आरएसएस म्हणजे देश नव्हे औरंगजेब बाबत देवेंद्र फडणवीस यांच्या वकक्तव्याला प्रकाश आबंडेकर यांचं प्रत्युत्तर
महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर्स आणि सोशल मीडिया स्टेटसवरून दंगली घडल्या होत्या. या दंगलींचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. परंतु, कुणी औरंगजेबाचं महिमामंडन करणार असेल, तर त्याला सोडणार …
Read More »म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. …
Read More »राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात १०९ देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, औरंगजेब इथल्याचा आदर्श कसा? निवडणूका आम्हालाही हव्यात पण… बारसू प्रकल्प पाकिस्तानात गेला
मागील काही दिवसांमध्ये औरंगजेब याच्या स्टेटसवरून दंगली घडल्या जात होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना म्हणाले, औरंगजेब हा तुर्की मंगोल वंशाचा होता. तो इथल्या मुस्लिमांचा आदर्श कसा असू शकतो असे सांगत राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार …
Read More »सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
सोलापूर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलल्याने उशीर विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील
राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय देण्याची गरज आहे. विजय वडेट्टीवार हे सक्षम विरोधी पक्षनेते असून आपली भूमिका समर्थपणे पार पाडतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »
Marathi e-Batmya