Breaking News

Tag Archives: mou

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी जलसंपदा आणि सात कंपन्यांमध्ये सामंजस्य करार ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक आणि ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे …

Read More »

उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया दरम्यान सामंजस्य करार ; १२० एकर जागेचे वाटपपत्र सुपूर्द ‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती

लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग …

Read More »

भारत आणि इराण सोबत चाबहर बंदराच्या अनुषंगाने द्विपक्षिय करार १२० कोटी रूपयांची गुंतवणूक भारताकडून इराणमध्ये

भारत आणि इराण यांच्यात सोमवारी चाबहार बंदराच्या कामकाजासंबंधी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीकोनातून इराण आणि भारता दरम्यान चाबहार बंदराच्या विकासाच्या अनुषंगाने इराण आणि भारत यांच्यात द्विपक्षीय करारावर सह्या करण्यात आल्या. भारताचे IPGL (इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड) चाबहार बंदरात $१२० दशलक्ष गुंतवणूक करणार आहे, तर चाबहारशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने परस्पर ओळखल्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंट च्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे मत कौशल्य,रोजगार,उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंट च्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर …

Read More »

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटीमध्ये सामंज्यस्य करार करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार- अध्यक्ष राहुल नार्वेकर

भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले. विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. …

Read More »

मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक सॅम्युएल आलेहान्द्रो यांचे प्रतिपादन

मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची अलीकडेच राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. नवेवो लिआन हे मेक्सिकोतील सर्वाधिक गुंतवणूक-स्नेही प्रगत राज्य असून राज्याची सीमा अमेरिकेशी जोडली असल्याने ते अनेक देशांशी व्यापाराचे प्रवेशद्वार आहे, असे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे …

Read More »

अतुल लोंढेचा आरोप, दावोसमध्ये करार केलेल्या कंपन्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्या दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …

Read More »

राज्यात होणार एलएनजी गॅसपासून वीजनिर्मिती

राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज किंग्ज् गॅस कंपनीसोबत राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरण प्रकल्पात राबविला जाणार आहे. लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ …

Read More »

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि होणार आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट होण्यासाठी आणि आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाने लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आदर्श अंगणवाड्यांना अद्ययावत करून त्या अधिक अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार करण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर …

Read More »