मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगांव …
Read More »वाईन शॉप्सवाले म्हणतात किमान ३ हजाराचे मद्यप्रेम दाखवा तरच मिळेल प्रेम दाखविण्याच्या पध्दतीमुळे तळीराम संतप्त
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेने मद्यप्रेमींसाठी आणि राज्यातील महसूलातील भर वाढविण्यासाठी सोमवारपासून वाईन्स शॉप्स (मद्यविक्रीची दुकाने) सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दुकानदारांनी किमान ३ हजार रूपयांची खरेदी करत असाल तरच तुम्हाला मदीरा घेता येईल अशी अट घातल्याने मद्यप्रेमींना घातल्याने तळीरामांनाकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी …
Read More »पुण्यातील मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे मुंबईसह महाराष्ट्राने अनुकरण करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन आणि आवाहन
मुंबई : प्रतिनिधी पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच …
Read More »दिलासादायक: एकाच दिवसात बरे होवून घरी जाणाऱ्यांचा विक्रम आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. …
Read More »कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली. सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय …
Read More »मुंबई- पुणेकरांनो ऐकत नाही ना काढून घेतल्या तुमच्या सवलती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे …
Read More »मृत्युदर चिंताजनक…तरी आत्मविश्वास वाढवूया मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण - डोंबिवलीत कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे शरद पवारांचे मत
मुंबई: प्रतिनिधी आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी निगेटिव्ह विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया… आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येईल याची काळजी घेवूया असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …
Read More »मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …
Read More »मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची …
Read More »शरद पवारांनाही आवडले अरूण दातें चे हे गाणे…बघाच त्यांचा व्हिडीओ सतत कार्यमग्न असणाऱ्या पवारांनाही आपले छंद जोपासायला भाग पाडले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र गेली ४०-५० वर्षे सतत राजकिय जीवनामुळे कार्यमग्न असणाऱ्या शरद पवारांना यामुळे काही काळ आपला छंद जोपासायला मिळाला. तसे त्यांना निवांत क्षणी पाहण्याचे भाग्य फारच थोड्या जणांना आहे. परंतु मराठी e-बातम्या.कॉमच्या हाती त्यांचा असाच एक दुर्मिळ व्हीडीओ हाती लागला. …
Read More »
Marathi e-Batmya