Tag Archives: mumbaikar

लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तत्पर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यास, वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका …

Read More »

आशिष शेलार यांची ग्वाही, मुंबईकरांच्या २५ हजारांहून अधिक इमारतींना ओसी देण्याबाबत धोरण शासन धोरण तयार करणार

महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने  मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस चाकरमान्यांसाठी एसटीची तयारी, वरिष्ठ आणि महिलांना सवलत

२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी

गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …

Read More »

अदानीने केलेली वीज दरवाढ मुंबईकरांचा खिसा रिकामा करणार महागाईच्या आगडोंबात मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचा फटका

मुंबईकर उन्हाच्या तडाख्याचा सामना करत असताना अदानी कंपनीने केलेल्या वीज दरवाढीमुळे मुंबईकरांना जोरदार झटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने होणारी दरवाढ म्हणजे ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जात असून उन्हात होरपळणाऱ्या मुंबईकरांना अदानीच्या वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. अदानीने ही वीज …

Read More »

पहिल्या वॉकेथॉनमध्ये ५००० हून अधिक मुंबईकरांचा सहभाग फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनद्वारे नागरिकांनी लुटला वॉकिंग कार्निव्हलचा आनंद

फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनच्या पहिल्या आवृत्तीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. फिटनेस आणि सामुदायिक बंधनासाठी चालण्याचा आनंद स्वीकारत ५,००० हून अधिक सहभागी मॅक्सिमम सिटीच्या रस्त्यावर उतरले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त आणि आयएएस अधिकारी आणि डॉ. भूषण गगराणी; महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी; महाराष्ट्राचे माजी पोलिस …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत हक्काचे घर गोळीबार खार भागातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्य रहिवाशाला …

Read More »

मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही

मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या …

Read More »

मुंबईकरांना मोठा दिलासा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात

महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. नवीन दर सोमवारपासून लागू झाले आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या …

Read More »