‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात …
Read More »पवारांचा सवाल, अमृता वहिनींना सांगू का? तर फडणवीस म्हणाले, सुनेत्रा वहिनींना विचारलं का? विधानसभेतील चर्चेवेळी देवेंद्र फडणवीस-अजित पवारांची परस्पर विरोधी टोले-बाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा- विदर्भ विषयावरील २९३ च्या विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लायवर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात एकही महिला सदस्या नसल्याची खंत व्यक्त करत याची तक्रार मिसेस फडणवीस यांना सांगू का असा सवाल करत मंत्रीमंडळाचा विस्तार करा असे …
Read More »मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, दादा, कार्यकर्ते ठेकेदारांसाठी सर्वपक्षिय बैठक घ्यावी लागेल अजित पवार यांना उद्देशून वक्तव्य करत नवे पोर्टल बनविणार असल्याची माहिती
विधानसभेचे नियोजित कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी भिवंडी-पालघर दरम्यानच्या खराब रस्त्याचा प्रश्न भाजपाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र रस्त्याची कामे देताना कार्यकर्त्ये ठेकेदार आणि मोठ्या कंत्राटदारांना कशी दिली जातात याची एकप्रकारे गौप्यस्फोटच भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला. यावेळी भिवंडी-पालघर रस्त्याचा …
Read More »अजित पवारांनी सुनावले, ठरावात त्या पाच शहरांचा उल्लेख नाही, व्याकरणात चुका… बेळगाव, कारवार, निपाणीसह असा उल्लेख ठरावात करावा ;ठरावातील चूक अजित पवारांनी आणली निदर्शनास...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला. मात्र त्या ठरावामध्ये बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख का केला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या पाच शहरांसह सर्व गावांचा उल्लेख ठरावात करावा असे सांगत ठरावात असलेली चूक …
Read More »अजित पवारांच्या तक्रारीवर फडणवीस म्हणाले, सभागृह तुम्ही चालवू देताय हे माहितच नव्हते… मुख्यमंत्री किमान प्रश्नोत्तराच्या दरम्यान सभागृहात आले पाहिजे-अजित पवार
विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उशीराने कामकाजात सहभागी झाल्यानतर.अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांकडे १४-१५ खाती आहेत. किमान प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान त्यांच्याकडील विभागाची उत्तरे त्यांनी स्वतः दिली असती तर अधिकची माहिती मिळाली असती. मात्र मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला …
Read More »अजित पवार म्हणाले,.. ती अध्यक्षांची जबाबदारी, तर अध्यक्ष म्हणतात विशेषाधिकार समितीत जा अध्यक्ष राज्य सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग
विधानसभा सदस्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या क्लोज रिपोर्टवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या प्रश्नी नियम ५७ अन्वये चर्चेची मागणी विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधानसभा सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे ही विधानसभा …
Read More »वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला हा सल्ला लॉकडाऊन लावला होता विसरू नका
राज्यात कोरोना संख्या नियंत्रणात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. मात्र मागील काही दिवसांपासून चीन, अमेरिका कोरियासह अन्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती पुढे आली. या पत्राचा अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »अजित पवार म्हणाले फडणवीसांना, आम्ही अनेकांची सरकारे पाह्यली पण…. निधी वाटपावरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने
आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा, याप्रश्नी चर्चा करा अशी मागणही त्यांनी यावेळी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी औचित्याचा मुद्दाद्वारे अजित पवार म्हणाले, …
Read More »अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ठरलेले कोण मोडतोय… कर्नाटक सरकारच्या आगळीकीनंतर अजित पवारांचा सवाल
कर्नाटक विधानसभेचं बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया …
Read More »अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...
अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya